बॉलीवूड अभिनेता श्रेयस तळपदेचे नाव अशा स्टार्सच्या यादीत समाविष्ट आहे जे त्यांच्या अभिनयासोबतच कॉमिक टायमिंगसाठी ओळखले जातात. श्रेयसने आपल्या कॉमेडीने लाखो-करोडो लोकांना वेड लावले असून येत्या काही दिवसांत तो 'कौन प्रवीण तांबे' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात श्रेयस तळपदे क्रिकेटपटू प्रवीण तांबेची भूमिका साकारत आहे. शिवाय झी मराठीवरील 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेतून त्याने टेलिव्हिजनवर देखील कमबॅक केले आहे. (फोटो सौजन्य-@shreyastalpade27/istagram)
श्रेयस तळपदे जितका त्याच्या प्रोफेशनल लाइफमुळे चर्चेत आहे तितकं तो त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलताना दिसत नाही. पर्सनल आणि प्रोफेशनल लाइफमध्ये अंतर कसे राखायचे हे त्याला चांगलेच ठाऊक आहे. मात्र, या सगळ्यामध्ये श्रेयस तळपदेची पत्नी दीप्ती तळपदेचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. (फोटो सौजन्य-@shreyastalpade27/istagram)
श्रेयस तळपदे आणि दीप्ती यांच्या लव्ह स्टोरीबद्दल (Shreyas Talpade and Dipti Talpade Love Story) सांगायचे तर श्रेयस आणि दीप्ती यांची पहिली भेट कॉलेजमध्ये झाली होती. 2000 साली श्रेयसला कॉलेजमध्ये फेस्टसाठी बोलावण्यात आलं होतं. कॉलेजच्या याच फेस्टिव्हलमध्ये दीप्ती सेक्रेटरी होती. यादरम्यान श्रेयस पहिल्या नजरेतच दीप्तीच्या प्रेमात पडलाय 2004 मध्ये दोघांचं लग्न झालं. लग्नाच्या 14 वर्षानंतर, 4 मे 2018 रोजी श्रेयस आणि दीप्ती सरोगसीच्या मदतीने मुलगी आद्याचे पालक बनले. (फोटो सौजन्य- @shreyastalpade27/istagram)
श्रेयसची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तो एक उत्तम अभिनेता असण्याबरोबरच एक चांगला फॅमिली मॅन देखील आहे. त्याची पत्नी दीप्ती तळपदे आणि मुलगी आद्या यांच्यावर त्याचं खूप प्रेम आहे, त्याने त्यांना प्रसिद्धीपासून दूर ठेवले आहे. श्रेयस एक उत्तम अभिनेता असण्यासोबतच एक प्रेमळ पती आणि वडील आहे यात शंका नाही. (फोटो सौजन्य- @shreyastalpade27/istagram)