

आपल्याला आपल्या बॉलिवूड कलाकारांचा नेहमीच अभिमान वाटतो. खासकरुन त्यावेळी ज्यावेळी ते जागतिक स्तरावर आपल्या देशाचं नाव उज्ज्वल करत आहेत. पण ऐकून आश्चर्य वाटेल यापैकी काही बॉलिवूड अभिनेत्री भारतीय नाहीत म्हणजे त्या परदेशात जन्मलेल्या आहेत. पाहूयात कोण आहेत या अभिनेत्री...


अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे. मात्र फार कमी लोकांना माहित आहे की, दीपिकाकडे भारतीय नागरिकत्त्व नाही. तिचा जन्म डेन्मार्क कोपेनहेगनमधील आहे. मात्र दीपिका 1 वर्षाची असताना तिचं कुटुंब बंगळुरूला शिफ्ट झालं. आज दीपिका फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर हॉलिवूडमध्येही प्रसिद्ध आहे.


अभिनेत्री कतरीना कैफसुद्धा भारतीय नाही ती एक ब्रिटीश मॉडेल आणि अभिनेत्री आहे. तिचं खरं नाव कतरीना टरकॉट असून ती जवळपास 10 वर्ष बॉलिवूडमध्ये काम करत आहे. सुरुवातीला हिंदी भाषा येत नसल्यानं कतरीनाला बॉलिवूडमध्ये काम करताना अनेक समस्या आल्या.


करोडो लोकांच्या हृदयावर राज्य करणारी आलिया भट सुद्धा भारतीय नाही. आलियाची आई सोनी राजदान या काश्मीरी जर्मन आहेत. तर वडील महेश भट गुजराती आहेत. आलियाकडे ब्रिटीश नागरिकत्त्व आहे.