HBD यामी गौतम: IAS ऑफिसर जागी झाली अभिनेत्री; आयुष्यात असा आला ट्विस्ट
यामी गौतमच्या (Yami Gautam) उरी द सर्जिकल स्ट्राईक (Uri: The Surgical Strike) चित्रपटाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली होती. या चित्रपटामध्ये तिच्यासोबत अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) मुख्य भूमिकेमध्ये झळकला होता.


विक्की डोनर या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या यामी गौतमचा (Yami Gautam) आज वाढदिवस आहे. यामी आज आपला 32वा वाढदिवस साजरा करत आहे. सन 2012मध्ये आयुष्यमान खुरानासोबत तिने विक्की डोनर या चित्रपटामधून हिंदी सिनेसृष्टीत पहिलं पाऊल टाकलं. खरंतर या आधी तिने कन्नड चित्रपटामध्ये काम केलं होतं.


यामी गौतमने चंदीगडमधून ‘लॉ’ची पदवी मिळवली आहे. एकेकाळी यामीला आयएएस ऑफिसर होण्याची इच्छा होती. त्याचदरम्यान तिला चित्रपटाची ऑफर आली तिने गंमत म्हणून होकारही दिला. त्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही.


बऱ्याच लोकांना माहिती नसेल की यामी गौतमच्या घरातूनच तिला अभिनयाचा वारसा मिळाला आहे. तिचे वडील पंजाबी सिनेमांच्या दिग्दर्शनाचं काम करतात.


यामीचा जन्म हिमाचल प्रदेशमध्ये झाला. यामीची बहीणही अभिनेत्री आहे. तिच्या बहिणीचं नाव सुरिली गौतम असून पॉवर कट या पंजाबी चित्रपटामधून तिने अभिनय क्षेत्रात पाऊल टाकलं होतं.


यामीच्या पहिल्याच सिनेमाला चांगलं यश मिळालं होतं. तिची आई आयुष्यमान खुरानाची जोडीही हिट झाली होती.


विक्की डोनर चित्रपटानंतर यामीने मागे वळून पाहिलंच नाही. बदलापूर, एक्शन जॅक्सन, काबिल आणि उरी अशा चित्रपटांमध्ये तिने भूमिका साकारल्या. अनेक जाहिरातींमधूनही यामी प्रेक्षकांच्या भेटीला येते.