बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) नेहमीच तिच्या फॅशन आणि बोल्ड फोटोमुळे चर्चेत असते. आता विदेशातही तिच्या फॅशनचा बोलबाला आहे. उर्वशी रौतेला अरब फॅशन वीकमध्ये (Arab Fashion Week) शोस्टॉपर ठरली आहे. अरब फॅशन वीकमध्ये शोस्टॉपर बनणारी उर्वशी पहिली भारतीय महिला ठरली आहे.
2/ 7
उर्वशीने हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. एकीकडे तिच्या फोटोला चाहत्यांनी पसंती मिळत असून, अनेकांनी तिला या फोटोमुळे ट्रोलही केलं आहे. (photo credit: instagram/@urvashirautela)
3/ 7
उर्वशी रौतेलाने (Urvashi Rautela Video) आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर काही व्हिडिओ शेअर केले आहेत. या व्हिडिओमध्ये ती सिल्व्हर रंगाच्या आउटफिट आणि सिल्व्हर आणि गोल्ड रंगाच्या ज्वेलरीमध्ये दिसतेय. (photo credit: instagram/@urvashirautela)
4/ 7
हेड ज्वेलरी, मोठे सिल्व्हर झुमके, गोल्डन आयशॅडो, सिल्व्हर आणि डायमंड ज्वेलरीसह तिने हा लूक कंप्लिट केला आहे. (photo credit: instagram/@urvashirautela)
5/ 7
या अरब फॅशन वीकसाठी उर्वशीने मेकअपही रियल गोल्डचा केला होता. (photo credit: instagram/@urvashirautela)
6/ 7
फॅशन वीकमध्ये केलेल्या या मेकअपसाठी २४ कॅरेट रियल गोल्डचा वापर करण्यात आला होता. (photo credit: instagram/@urvashirautela)
7/ 7
याबाबतची माहिती स्वत: उर्वशीने दिली आहे. माझ्या डोळ्यांवर अतिशय अनमोल २४ कॅरेट खऱ्या सोन्याचा आयशॅडो लावला असल्याचं तिने सांगितलं. (photo credit: instagram/@urvashirautela)