बॉलिवूड अभिनेत्री तारा सुतारिया सध्या सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह दिसून येते. ती आपल्या चित्रपटांसोबतच आपल्या प्रेमप्रकरणामुळेसुद्धा चर्चेत आली आहे. तारा सध्या कपूर कुटुंबातील मुलासोबत नात्यात असल्याचं म्हटलं जातं. त्यामुळेच ती सतत कपूर कुटुंबाच्या सर्वच खाजगी कार्यक्रमांमध्ये दिसून येते.