दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा आज आपला 34 वा वाढदिवस साजरा करत आहे. सोनाक्षी सिन्हा नेहमीच आपल्या बिनधास्त अंदाजामुळे ओळखली जाते. सोनाक्षीचा जन्म 2 जून 1987 मध्ये पटना, बिहारमध्ये झाला होता. सोनाक्षी सिन्हा प्रसिद्ध अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी आहे. 'दबंग' या पहिल्याच चित्रपटातून सुपरस्टार झालेल्या सोनाक्षी सिन्हाला मात्र अभिनेत्री व्हायचं नव्हत. सोनाक्षी सिन्हाला एक फॅशन डिझायनर व्हायचं होतं. आणि फॅशन दुनियेमध्ये मोठ नाव कमवायचं होतं. मात्र ज्यावेळी दबंगसाठी अभिनेत्रीचा शोध सुरु होता. तेव्हाच सलमान आणि अरबाज खानला सोनाक्षी सिन्हा दिसली होती. आणि सोनाक्षीच या रोलसाठी योग्य आहे असं सलमान आणि अरबाजला वाटलं होतं. तिथून सोनाक्षी सिन्हाच्या आयुष्याला नवं वळण मिळालं. सध्या सोनाक्षी बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींमधील एक समजली जाते.