Gudi Padwa 2022: नऊवारी साडी, नाकात नथ, मराठमोळ्या रुपात खुललं श्रद्धा कपूरचं सौंदर्य, तुम्ही पाहिलात का फोटो?
बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर पडद्यावर जितकी मॉडर्न आणि स्टायलिश असते. खऱ्या आयुष्यात ती तितकीच सोज्वळ आणि साधी आहे. अभिनेत्रीने नुकतंच गुढीपाडवा साजरा केला.
|
1/ 8
बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर पडद्यावर जितकी मॉडर्न आणि स्टायलिश असते. खऱ्या आयुष्यात ती तितकीच सोज्वळ आणि साधी आहे. अभिनेत्रीने नुकतंच गुढीपाडवा साजरा केला.
2/ 8
श्रद्धा कपूरने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपले काही फोटो शेअर केले आहेत.
3/ 8
यामध्ये ती मराठमोळ्या लुकमध्ये दिसून येत आहे. अभिनेत्रीने पारंपरिक नऊवारी साडी नेसली आहे.
4/ 8
शेअर केलेल्या फोटोंमध्ये श्रद्धा कपूरने पिवळ्या आणि जांभळ्या रंगाची नऊवारी साडी नेसली आहे. सोबतच हातात बांगड्या आणि गळ्यात पारंपरिक दागिने घातले आहेत.
5/ 8
इतकंच नव्हे तर श्रद्धाने आपल्या नाकात स्त्रियांचं सौंदर्य खुलवणारी पारंपरिक नथसुद्धा घातली आहे. यामध्ये अभिनेत्रीचं सौंदर्य आणखीनच खुलून दिसत आहे.
6/ 8
श्रद्धा कपूर नेहमीच इतक्या आनंदाने आणि उत्साहाने महाराष्ट्रातील प्रत्येक सण साजरे करत असते.
7/ 8
खरं तर, श्रद्धा कपूरची आई ही महाराष्ट्रीयन आहे. त्यामुळेच तिच्यात मराठीचा गोडवा आहे. अभिनेत्री उत्तम मराठीसुद्धा बोलते.
8/ 8
श्रद्धाचं साडीवर प्रचंड प्रेम आहे. ती नेहमीच आपल्या सोशल मीडियावर साडीतील विविध फोटो शेअर करत असते.