अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा गुरुवारी एका ठिकाणी आपल्या गोंडस मुलीला समीशाला घेऊन आली होती. त्या वेळी तिथे उपस्थित फोटोग्राफर्सनी या सुंदर मायलेकींचे खूप फोटो काढले. निळ्या ड्रेसमध्ये शिल्पा शेट्टी खूपच छान दिसत होती पण तिच्यापेक्षा तिच्या गोंडस मुलीने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. या दोघींचे हे फोटो सध्या इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.
हे फोटो इंटरनेटवर झळकता क्षणीच समीशावर नेटीझन्सच्या कौतुकाचा वर्षाव होत आहे. एकाने ‘ती तिच्या वडीलांसारखी दिसते’ अशी कमेंट केली आहे, तर एकाने तिला ‘क्युटी’ संबोधले आहे. अनेकांनी हार्ट शेपच्या इमोजी टाकल्या आहेत. शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या या प्रिन्सेसचा जन्म सरोगसीच्या माध्यमातून या वर्षी १५ फेब्रुवारी रोजी झाला.