बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान आपल्या प्रोफेशनल लाईफसोबतच आपल्या पर्सनल लाईफमुळे सतत चर्चेत असते. आजही असंच काहीसं झालं आहे.
2/ 9
सारा अली खानने नुकतंच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर लंडनचे काही फोटो शेअर केले आहेत. साराने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती तिचे वडील सैफ आणि भाऊ इब्राहिम-जेहसोबत लंडनच्या पार्कमध्ये पोज देताना दिसत आहे.
3/ 9
अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री करिना कपूर खान सध्या लंडनमध्ये आपल्या मुलांसोबत सुट्टी एन्जॉय करताना दिसून येत आहेत.
4/ 9
महत्वाचं म्हणजे सैफ आणि करिनासोबत, सारा ली खान खान आणि इब्राहिमसुद्धा आहेत.
5/ 9
सारा आणि इब्राहिम ही करिनाची सावत्र मुले आहेत. ती दोघे अमृताची मुले आहेत.
6/ 9
मात्र या दोघांचंही करिना कपूरसोबत फार छान बॉन्डिंग आहे. त्यामुळे ते सतत तिच्यासोबत दिसून येतात.
7/ 9
सारा अली खानने हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करताच मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.
8/ 9
अवघ्या काही तासापूर्वी इन्स्टावर शेअर केलेल्या या फोटोंना जवळजवळ 10 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.
9/ 9
कामाबाबत सांगायचं तर, सारा लवकरच आदित्य धरच्या 'द इमॉर्टल अश्वत्थामा' या चित्रपटात विकी कौशलसोबत दिसणार आहे.