

अभिनेत्री रकुल प्रीत सिंहने मालदीव सुट्टी एन्जॉय करताना काही स्टनिंग फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. निळ्याशार पाण्यातील रकुलचा हा फोटो फारच स्टनिंग आहे. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)


बीटाऊनमधील अनेक कलाकार मालदीवमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहेत. यामध्ये आता रकुल देखील मालदीवमध्ये पोहोचली आहे. रकुलचे फोटो पाहून सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस पडत आहे. तिने या फोटोला असं कॅप्शन दिलं आहे की, 'हसू हे संक्रमित होणारं आहे, त्याचे वाहक बना.' (फोटो सौजन्य: Rakul Preet/ Instagram)


30 वर्षीय अभिनेत्री तिच्या कुटुंबीयांसमवेत ही सुट्टी एन्जॉय करत आहे. तिने शेअर केलेले काही फोटो तिच्या वडिलांनी काढले आहेत. या फोटोमध्ये रकुल समुद्रावर वर्कआऊट करताना दिसत आहे. (फोटो सौजन्य-Rakul Preet/ Instagram)


रकुलचे बिकीनीमधील फोटो तर सुंदर आहेतच पण हिरव्या रंगाच्या या मोनोकिनी आऊटफिटमध्ये ती खूप बोल्ड दिसत आहे. समुद्राशेजारीज असणाऱ्या bungalow मध्ये तिने हा फोटो काढला आहे. (फोटो सौजन्य: Rakul Preet/ Instagram)


वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, एस शंकर दिग्दर्शित इंडियन 2 मध्ये रकुल दिसणार आहे. त्याचप्रमाणे अॅटॅक या बॉलिवूड सिनेमात रकुल जॉन अब्राहम बरोबर स्क्रीन शेअर करणार आहे तर अर्जून कपूरबरोबर सरदार अँड ग्रँडसन मध्ये ती दिसणार आहे. अमिताभ बच्चन आणि अजय देवगण यांच्याबरोबर ती Mayday मध्ये दिसणार आहे. (फोटो सौजन्य-Rakul Preet/ Instagram)