बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंतची काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यात ती चक्क रस्त्यावर डोकं ठेऊन रडताना दिसत आहे. खरं तर हे राखीचे आनंदाश्रू आहेत. कारण राखीच्या आईवरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे.
2/ 8
राखी सावंत गेल्या कित्येक दिवसांपासून आपल्या आईच्या आजारामुळे चिंतेत होती. राखीची आई कॅन्सरने ग्रस्त होती.
3/ 8
राखीच्या आईवर यशस्वी शस्त्रक्रिया करत ट्युमर काढण्यात आलं आहे. राखीने स्वतः ही माहिती माध्यमांना दिली आहे.
4/ 8
माध्यमांशी बोलताना राखीनं म्हटलं आहे, माझ्या आईला सलमान खान आणि सोहेल खानने वाचवलं आहे. ते माझ्यासाठी कोणत्याही देवदूतापेक्षा कमी नाहीत.
5/ 8
राखीने अक्षरशः जमिनीवर डोकं टेकून सलमान खान आणि सोहेल खानचे आभार मानले आहेत.
6/ 8
राखी सावंत गेल्या कित्येक दिवसांपासून आपल्या आईला यातून मुक्त करण्यासाठी झटत होती.
7/ 8
राखी सावंत नुकतंच 'बिग बॉस 14' मध्ये सहभागी झाली होती. मात्र तिथेसुद्धा ती आपल्या आईच्या उपचारासाठी पैसे जमा करण्याच्या उद्देशाने गेली होती.
8/ 8
बिग बॉस 14 मधून मिळालेली रक्कमसुद्धा तिने आईच्या उपचारासाठी वापरली आहे. राखीची आईनेही शस्त्रक्रियेच्या आधी सलमानचे आभार मानले होते.