प्रियांका चोप्राने आपली बायोग्राफी 'Unfinished' बद्दल सांगितली ही गोष्ट
प्रियांकाच्या बायोग्राफीतून बॉलिवूड क्षेत्रातील तिचा अनुभव व त्यासंदर्भातील अनेक गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे
|
1/ 5
अभिनेत्री प्रियांका चोप्राने मंगळवारी आपल्या अनुभवांवर आधारित पुस्तकाबाबत खुलासा केला आहे. 'अनफिनिश्ड' (Unfinished) पुस्तक लिहून संपल्याचे तिने यावेळी सांगितले. लवकरच याचे प्रकाशन होणार आहे.
2/ 5
'अनफिनिश्ड' (Unfinished) या बायोग्राफीत अभिनेत्रीने आपल्याला आलेले अनुभव, विचारांचा संग्रह आदींविषयी लिहिलं आहे. पेंग्विन रेंडम हाऊस इंडिया याचं प्रकाशन करणार आहे.
3/ 5
या बायोग्राफीतील प्रत्येक शब्द माझं आयुष्य दर्शवतं, असं प्रियांकाने आपल्या ट्विट मध्ये म्हटलं आहे.
4/ 5
प्रियांकाने वयाच्या 17 व्या वर्षी मनोरंजन क्षेत्रात पाऊल ठेवलं. पहिल्यांदा तिची मिस इंडिया या स्पर्धेत निवड झाली, त्यानंतर ती मिस वर्ल्डही झाली. प्रियांकाने ऐतराज, बर्फी, सात खून माफ आणि बाजीराव मस्तानी सारख्या हिट चित्रपटात काम केलं आहे.
5/ 5
प्रियांकाने बेवॉच चित्रपटातून ह़ॉलिवूड चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली. याशिवाय ए किड लाइक जॅक या चित्रपटातही काम केलं आहे.