बॉलिवूड आणि हॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने नुकताच न्यूयॉर्कच्या प्राइड परेडमध्ये सहभाग घेतला होता. यावेळी ती एका पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये खुपचं सुंदर दिसत होती.
2/ 8
प्रियांका चोप्राने आपल्या इन्स्टाग्रामवर फोटो शेयर करत याबद्दलची माहिती दिली होती. तसचं कॅप्शन देत म्हटलं होतं, 'फिलिंग द लव्ह इन NYC..हप्पी प्राइड'
3/ 8
यावेळी प्रियांका चोप्राने फुल्ल स्लीव्ह असलेला टॉप आणि स्लीट स्कर्ट परिधान केलं होतं.
4/ 8
माध्यमांच्या अहवालानुसार, प्रियांकाचा हा टॉप एरॉन आंतराष्ट्रीय ब्रँडचा आहे. त्याची किंमत तब्बल 17 हजार 256 रुपये इतकी आहे. तर स्कर्टची किंमत 20 हजार 263 रुपये इतकी आहे.
5/ 8
त्याचबरोबर प्रियांकाने गोल्ड ब्रेसलेट, गोल्ड इयरिंग आणि गोल्ड वॉचसुद्धा घातलं होतं. अनेक डिझायनर आणि कलाकार प्रियांकाच्या या लुकची चर्चा करत होते.
6/ 8
प्रियांकाचे हे फोटो चाहत्यांना खुपचं पसंत पडले आहेत.
7/ 8
इतकचं नव्हे तर चाहत्यांनी कमेंट करत 'क्वीन ऑफ हॉलिवूड' सुद्धा म्हटलं आहे.
8/ 8
बॉलिवूड ते हॉलीवूड प्रियांकाने आपल्या अभिनयाचा कस दाखवला आहे. प्रियंका नेहमीच आपल्या बिनधास्त स्वभावासाठी ओळखली जाते. नुकताच प्रियांकाने ओटीटीमुळे काही खास लोकांचा दबदबा कमी झाल्याचं म्हटलं होतं.