मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » प्रियांकाच्या न्यूयॉर्कमधील नव्या रेस्टॉरंटमध्ये मिळणार डोसा, नान, भजी; निकबरोबर पूजा करून केलं उद्घाटन, पाहा PHOTO
प्रियांकाच्या न्यूयॉर्कमधील नव्या रेस्टॉरंटमध्ये मिळणार डोसा, नान, भजी; निकबरोबर पूजा करून केलं उद्घाटन, पाहा PHOTO
फक्त भारतातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्थरावर आपल्या अभिनयाने आपलं नाव चमकवणारी अभिनेत्री म्हणून प्रियांका चोप्राकडे पाहिलं जातं. प्रियांकाने अभिनया व्यतिरिक्त एक व्यावसायिक होतं नुकताच न्यूयॉर्क मध्ये एक रेस्टोरंट सुरु केलं आहे.
फक्त भारतातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या अभिनयाने आपलं नाव चमकवणारी अभिनेत्री म्हणून प्रियांका चोप्राकडे पाहिलं जातं. प्रियांक आता बिझनेस वुमनही झाली आहे. न्यूयॉर्कमध्ये तिने स्वतःचं रेस्टॉरंट सुरू केलं आहे.
2/ 10
प्रियांकाने स्वतः आपल्या सोशल मिडियावरून पोस्ट करत याबद्दलची माहिती चाहत्यांना दिली होती. रेस्टॉरंटचं नाव 'सोना' असं आहे. निकबरोबर पारंपरिक हिंदू पद्धतीने पूजा करत तिने या हॉटेलचं उद्घाटन केलं.
3/ 10
प्रियांकाने आपल्या रेस्टॉरंटमध्ये मिळणाऱ्या पदार्थांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. वैशिष्ट्य म्हणजे हे सर्व भारतीय पदार्थ आहेत. वेगवेगळ्या राज्यांची वैशिष्ट्य असणाऱ्या डोसा, भजी सारख्या पदार्थांचा यामध्ये समावेश आहे.
4/ 10
या पदार्थांमध्ये नान आणि चटणीचा देखील समावेश करण्यात आला आहे. प्रियांकाने न्यूयॉर्कमध्ये सुद्धा पुरेपूर भारतीय अनुभव यावा असा प्रयत्न केला आहे.
5/ 10
प्रियांकाने काही खास भारतीय पद्धतीच्या डेझर्टचा देखील मेन्यूमध्ये समावेश केला आहे. अत्यंत आकर्षक पद्धतीने डिश डेकोरेट करून ते सर्व्ह केले जाणार आहेत.
6/ 10
प्रियांकाने नुकताच या रेस्टॉरंटचं उद्घाटन केलं. यावेळी तिच्याबरोबर नवरा निक होता आणि तिचा अत्यंत जवळचा मित्र मनीषसुद्धा उपस्थित होता.
7/ 10
प्रियांकाने भारतीय खाद्यपदार्थांवरील आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी हा प्रयत्न केला आहे.
8/ 10
प्रियांकाने उद्घाटनावेळी पोस्ट मध्ये लिहिलं होतं की, या महिन्याच्या अखेरपर्यंत हे रेस्टोरंट सुरू करण्यात येईल. आणि आत्ता त्याप्रमाणे हे सर्वांसाठी खुले करण्यात आलं आहे.
9/ 10
या रेस्टॉरंटची झलक दाखवणारे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अतिशय सुंदर सजावट केलेलं आणि भारतीय टच असलेलं हे डिझाइन पाहून प्रियांकाने सर्वांनाचं सुखद धक्का दिला आहे.
10/ 10
भारतापासून दूर राहूनसुद्धा भारताचा आनंद देणारं असं हे ठिकाण प्रियांकाने न्यूयॉर्करांसाठी सज्ज केलं आहे.