अभिनेत्री परिणीती चोप्रा सध्या सुट्टीचा आनंद घेत आहे. परिणीती ऑस्ट्रिया मध्ये आपली सुट्टी एन्जॉय करत आहे. . परिणीती दररोज आपल्या सुट्टीचे फोटो चाहत्यांशी शेयर करत आहे. फोटोमध्ये परिणीती फक्त चिल करताना दिसत आहे. तिचे हे सुंदर फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतं आहेत. नुकताच परिणीतीने आपला बीचवरचा बिकिनी फोटो शेयर केला होता. त्या फोटोवर अभिनेत्री आणि बहीण प्रियांका चोप्राने सुद्धा खास कमेंट केली होती. परिणीतीचे हे फोटो चाहत्यांनासुद्धा खुपचं पसंत पडत आहेत.