मौनी रॉयचा Stunning अंदाज, या लेटेस्ट फोटोंवर 4 लाखांपेक्षा जास्त लाइक्स
मौनी रॉय (Mouni Roy) च्या या फोटोंवर 4 लाखांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. अभिनेत्रीने टेलिव्हिजननंतर आता बॉलिवूडही गाजवण्यास सुरुवात केली आहे, त्यामुळे तिचा चाहतावर्ग देखील वाढत चालला आहे.


टेलिव्हिजन वर 'नागिन' या भूमिकेतून प्रसिद्ध झालेली मौनी रॉय (Mouni Roy) आता बॉलिवूड सिनेमाच्या माध्यमातून घराघरात पोहोचली आहे. बॉलिवूडमध्ये तिने तिची ओळख निर्माण केली आहे. अक्षय कुमार, राजकुमार राव यांसारख्या अनेक बड्या कलाकारांबरोबर तिने काम केेल आहे. दरम्यान सोशल मीडियावर देखील ती विशेष सक्रीय असतेय. (फोटो सौजन्य-@imouniroy)


सोशल मीडियावर तिने नुकतेच पोस्ट केलेले फोटो चाहत्यांना घायाळ करत आहेत. तिचं हे नवीन फोटोशूट हॉट आणि Elegant देखील आहे. (फोटो सौजन्य-@imouniroy)


अभिनेत्री मौनी रॉयने यामध्ये स्काय कलरचा ड्रेस परिधान केला आहे. फोटोतील बॅकग्राऊंडही खास आहे. त्यामध्ये तिचा लुक खूप ग्लो करत आहे (फोटो सौजन्य-@imouniroy)


मौनीचे हे फोटो आतापर्यंत 4 ते 5 लाख युजर्सनी लाइक केले आहेत. त्यावर चांगल्या कमेंट्स देखील येत आहेत. (फोटो सौजन्य-@imouniroy)


हिंदी टेलिव्हिजन व्यतिरिक्त आता मौनीने बॉलिवूड फिल्म्समधून देखील तिचा चाहता वर्ग कमावला आहे. गोल्ड, मेड इन चायना हे तिचे काही गाजलेले चित्रपट आहेत. तिच्या अपकमिंग प्रोजेक्ट्ससाठी देखील चाहतावर्ग उत्सूक आहे. ती आगामी सिनेमा 'ब्रह्मास्त्र'मध्ये देखील दिसणार आहे (फोटो सौजन्य-@imouniroy)