

बॉलिवूड अभिनेत्री लिसा रे सध्या आपल्या जुळ्या मुलींच्या संगोपनात व्यग्र आहे. लिसा सिनेमांपासून जरी दूर असली तरी सोशल मीडियावर ती फार सक्रिय आहे. अनेकदा ती आपल्या कामांचे आणि मुलींचे फोटो, व्हिडिओ शेअर करत असते.


नुकतेच तिने आपल्या मुलींचे साडीतले फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले. लिसाच्या मुलींचे हे फोटो पाहिल्यावर तुमचीही नजर त्यांच्यावरून हटणार नाही.


साडीमध्ये लिसाच्या दोन्ही मुली फार सुरेख दिसत आहेत. इवलुशा मुलींनी घातलेल्या छोट्याशा साड्या आणि टिकलीमुळे त्यांच्यावरची नजर हटत नाही.


लिसा स्वतः एका बंगाली कुटुंबात लहानाची मोठी झाली. त्यामुळे लिसा तिच्या मुलींनाही अनेकदा पारंपरिक साड्यांमध्ये नटवताना दिसते.


या फोटोमध्ये लिसाच्या मुलींनी लाल रंगाची आणि पांढऱ्या रंगाची बंगाली साडी नेसली आहे. लाल रंगाची साडी आणि स्टायलिश ब्लाऊजमध्ये दोन्ही मुली फारच क्युट दिसतात.


लिसा अनेकदा पतीसोबत मुलीचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. २०१२ मध्ये मॅनेजमेन्ट कंसल्टंट जेसन डेनीशी लग्न केलं होतं.