अभिनेत्री कीर्ती कुल्हारीनं सोशल मीडियावर एक पोस्ट करत सर्वांनाचं धक्का दिला आहे. सध्या ही पोस्ट खूपच व्हायरल होतं आहे.
2/ 10
या पोस्टमध्ये कीर्तीनं आपला पती साहिल सेहगल सोबत विभक्त होतं असल्याचं लिहिलं आहे. कागदावर नव्हे, तर आयुष्यात आम्ही दोघे विभक्त होतं असल्याचं म्हटलं आहे.
3/ 10
कीर्तीनं असंही म्हटलं आहे की आम्ही दोघांनी एकमेकांच्या सहमतीनं हा निर्णय घेतला आहे.
4/ 10
कीर्तीनं म्हटलं आहे, की हे खूपचं कठीण आहे. कारण जेव्हा आपण एकत्र येतो तेव्हा सर्वजण मिळून हा आनंद साजरा करतो. मात्र जेव्हा विभक्त होण्याचा निर्णय घेतो. तेव्हा यासोबत खूप दुःख सुद्धा आपल्या समोर असतं आणि आपण एकटे असतो.
5/ 10
कीर्ती कुल्हारी ही एक अभिनेत्री आणि मॉडेल सुद्धा आहे. तिनं अनेक चित्रपटांत अभिनय केला आहे.
6/ 10
तिनं 2010 मध्ये 'खिचडी द मुव्ही' मधून अभिनयाला सुरुवात केली आहे. त्यानंतर 2011 मध्ये ती शैतान या चित्रपटात सुद्धा दिसून आली होती.
7/ 10
कीर्ती दिवंगत अभिनेता इरफान खान सोबत सुद्धा झळकली होती. ब्लेकमेल असं या चित्रपटाचं नाव होतं.
8/ 10
कीर्तीही मूळची झुंझुन्नु , राजस्थानची आहे. तिनं जनसंवाद आणि पत्रकारिताचं शिक्षण सुद्धा पूर्ण केलं आहे.
9/ 10
कीर्तीनं साहिल सेहगल सोबत 2016 मध्ये भुटान येथे लग्नं केलं होतं.
10/ 10
कीर्तीनं मिशन मंगल, पिंक, सुपर से उपर, जल या चित्रपटांत अभिनय केला आहे.