आपल्या सौंदर्यांने चाहत्यांना भुरळ घालणाऱ्या करिश्मा तन्नाचा BOLD LOOK आला समोर, PHOTO इंटरनेटवर व्हायरल
टीव्हीपासून ते मोठ्या पडद्यापर्यंत सर्वच ठिकाणी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना मोहिनी घालणाऱ्या करिश्मा तन्नाचे (Karishma tanna) बोल्ड फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये तिचा अत्यंत ग्लॅमरस लुक (Glamorous Look) पाहायला मिळत आहे.


मुंबई, अगदी टीव्हीपासून ते मोठ्या पडद्यापर्यंत सर्वच ठिकाणी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना मोहिनी घालणारी करिश्मा तन्ना आजकाल तिच्या काही फोटोंमुळे बरिच चर्चेत आहे. सध्या करिश्मा तन्नाचे काही फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यात ती अत्यंत बोल्ड लुकमध्ये पाहायला मिळत आहे. (फोटो साभार- Instagram @karishmaktanna)


स्वतः करिश्माने हे फोटोज तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केली आहेत, ज्यामध्ये ती खूपच बोल्ड दिसत आहे. (फोटो साभार- Instagram @karishmaktanna)


करिश्माने शेअर केलेले हे फोटो सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहेत. तिचे हे फोटो लोकांना खूपच आवडत आहेत. (फोटो साभार- Instagram @karishmaktanna)


आता चाहतेही करिश्माच्या फोटोंवर कमेंट करत सुटले आहेत, अनेक चाहत्यांनी कमेंट बॉक्समध्ये करिष्माच्या सौंदर्याचं कौतुक केलं आहे. (फोटो साभार- Instagram @karishmaktanna)


करिश्मा इन्स्टाग्रामच्या माध्यमातून नेहमीच तिच्या चाहत्यांशी जोडली गेलेली असते आणि ती तिची नवनवीन फोटो येथे शेअर करत असते. (फोटो साभार- Instagram @karishmaktanna)


इन्स्टाग्रामवर करिश्माला 58 लाखाहून अधिक लोकं फोल्लो करतात. त्यामुळेच तिचे फोटो सोशल मीडियावर टाकताच क्षणी व्हायरल व्हायला सुरू होतात. (फोटो साभार- Instagram @karishmaktanna)


करिश्मा तन्ना तिच्या बोल्डनेसमुळे चर्चेत येण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही करिश्माने अनेक वेळा तिचे बोल्ड फोटो शेअर केले आहेत. (फोटो साभार- Instagram @karishmaktanna)