कंगना रणौत बॉलिवूडमधील यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहे. तसेच ती चित्रपट निर्मातीदेखील बनली आहे. कंगना ही बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये गणली जाते. तिने पडद्यावर अनेक दमदार भूमिका साकारल्या आहेत. एकेकाळी उपाशी झोपलेल्या या अभिनेत्रीचे यश थक्क करणारे आहे. हिमाचल प्रदेशातील भांबला येथे 23 मार्च 1987 रोजी जन्मलेल्या या अभिनेत्रीला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती.