

बॉलीवूड अभिनेत्री काजल अग्रवालचे ब्लॅक लुकमधील ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. (Photo- Instagram/ Kajal Aggarwal)


अनेक चाहत्यांनी प्रतिक्रिया देवून तिच्या सौंदर्याचं कौतुक केलं आहे. काजल अग्रवाल बॉलीवूडच्या सिंघम चित्रपटात अजय देवगनसोबत दिसली होती. यावेळी अनेकांनी तिच्या अभिनयाचं कौतुक केलं होतं. (Photo- Instagram/ Kajal Aggarwal)


काजल अग्रवालने अलिकडेच ब्लॅक कलरचे कपडे परिधान करून फोटोशूट केलं आहे. तिने हे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. 'जर यापेक्षा गडद रंगाची निर्मिती झाली, तर मी गडद काळ्या रंगाचे कपडे घालणं सोडून देईल' असं तिने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. (Photo- Instagram/ Kajal Aggarwal)


सिंघम फेम बॉलीवूड अभिनेत्रीचा हा लुक खूपच व्हायरल होत आहे. ती नेहमी तिचे लेटेस्ट फोटो तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर करत असते. (Photo- Instagram/ Kajal Aggarwal)