Janhvi Kapoor Starts South Film NTR 30: बॉलवूडनंतर जान्हवी कपूर साऊथ फिल्म इंडस्ट्रीत नशीब आजमावण्यासाठी सज्ज झाली आहे. तिनं तिच्या ‘एनटीआर 30’ या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरूवात केली आहे
2/ 8
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर आणि RRR स्टार जूनियर एनटीआर यांच्या ‘एनटीआर 30’ या सिनेमाच्या चित्रीकरणाला आजपासून सुरूवात झाली.
3/ 8
या सिनेमाचा आज मुहूर्त करण्यात आला. याचे काही फोटो समोर आले आहेत. यावेळी एसएस राजामौली देखील उपस्थित होते.
4/ 8
जान्हवीनं देखील या सिनेमाच्या चित्रीकरणाच्या पहिल्या दिवासाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. चाहत्यांनी तिला शुभेच्छा देखील दिल्य़ा आहेत.
5/ 8
जाह्नवी कपूर आणि साउथ सुपरस्टार जूनियर एनटीआर यांचा सिनेमा येणार असल्याचे यापूर्वीचं जाहीर केलं होतं. गुरूवारी एसएस राजामौली यांनी फर्स्ट क्लॅर देऊन एनटीआर 30’ सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरूवात केली.
6/ 8
या सिनेमाची निर्मिती एनटीआर आर्ट्स प्रोडक्शन कंपनीचे हरी कृष्णा के आणि युवा सुधा आर्ट्सचे सुधाकर मिक्कीलिनेनी करत आहेत.
7/ 8
जान्हवी कपूर आणि जूनियर एनटीआर यांचा हा सिनेमा 5 एप्रिलला रिलीज होणार आहे. जान्हवीनं अनेकदा सांगितलं आहे की, जूनियर एनटीआरसोबत काम करणं तिचं स्वप्न आहे, बऱ्याच काळापासून मी याची वाट पाहत आहे.
8/ 8
‘एनटीआर 30’ सिनेमा सुरूवातीपासूनच चर्चेत आहे. RRR च्या यशानंतर आता प्रेक्षक जूनियर एनटीआरच्या सिनेमाची वाट पाहत आहेत.