

बॉलिवूड सेलिब्रिटी सध्या सुट्टीच्या मूडमध्ये आहेत आणि त्यांची सगळ्यात आवडती जागा ‘मालदीव’च आहे. गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी मालदीवला जात आहेत. गुल पनागसुद्धा (Gul Panag) मालदीव आणि गोव्याला भटकंतीसाठी गेली होती. गुल पनागने तिच्या स्पेशल व्हेकेशनचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.


गुल पनागने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिचा बोल्ड अवतार दिसत आहे. गुल म्हणते, ‘मालदीव आणि गोवा ही ठिकाणं एवढी आवडली आहेत की मला परत तिथे जावसं वाटत आहे.’


या फोटोंमध्ये गुल पनाने 2 स्विमिंग सूट घातलेले आहेत. त्यातला कोणता स्विमिंग सूट आवडला असा प्रश्न तिने कॅप्शनमध्ये विचारला आहे.


अभिनेत्री गुल पनागने आत्तापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. पण रंगबाज फिरसे, पाताल लोक या वेब सीरिजमधून तिला प्रचंड प्रसिद्धी मिळाली.