सध्या बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहा आणि त्याची पत्नी दीपिका पादुकोण त्यांच्या आगामी '83' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हे जोडपं दुबईला गेलं होतं. प्रमोशनशी संबंधित अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये रणवीर सिंह नेहमीप्रमाणे विचित्र आउटफिटमध्ये दिसत आहे. यावेळी अभिनेता डिस्को डान्सर लूकमध्ये दिसला. या लूकचा फोटोही त्याने त्याच्या इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. मात्र युजर्ससोबत पत्नी दीपिका पादुकोणनंदेखील त्याची खिल्ली उडवली आहे.