'आपलं मूळ, संस्कृती विसरतात ती माणसं म्हणजे मूळ नसलेली झाडं', दीपिकाच्या 'त्या' पोस्टची चर्चा
#amchigele असं लिहून दीपिकाने तिच्या कोकणी मुळाचा उल्लेख करत एक पोस्ट केली ती चर्चेत आहे.
|
1/ 8
बाॅलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये दीपीका पादुकोणनची गणना केली जाते.
2/ 8
दीपिकाच्या क्रेझी लूक, अनोखा अंदाज, हटके फॅशन सेन्समुळे नेहमीच प्रशंसा मिळत असते.
3/ 8
नुकतेच दीपीकानं इन्स्टाग्रामवर तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती परदेशात देसी लूकमध्ये रस्त्यावर फिरताना पहायला मिळतेय.
4/ 8
लेटेस्ट फोटोंची कॅप्शन तिने आपल्या समाजाला डेडिकेट केली आहे. #amchigele असं म्हणत तिच्या कोकणी मूळाचा तिने उल्लेख केला आहे.
5/ 8
आपलं मूळ, आपला इतिहास, आपली संस्कृती विसरतात ती माणसं मूळ नसलेल्या झाडासारखी असतात, असं लिहून दीपिकाने आपल्या मूळ समाजाचा गौरव करत परदेशात हा देसी लुक मिरवला. सॅन होजेमध्ये कोकणी संमेलनासाठी ती चीफ गेस्ट म्हणून गेली होती.
6/ 8
गुलाबी सूट आणि दीपिकाची किलर स्माईलनं चाहत्यांनाा वेडं केलं आहे. या फोटोंना दीपिकानं कॅप्शन दिलं की, ज्या लोकांना त्यांचा भूतकाळ, मूळ आणि संस्कृतीची माहिती नसते ते मुळ नसलेल्या झाडासारखे असतात.
7/ 8
दीपिकाच्या कामाविषयी बोलायचं झालं तर ती लवकरच 'पठाण' चित्रपटात दिसणार आहे.
8/ 8
आगामी 'सर्कस' या चित्रपटात तिची कॅमिओ भूमिका दिसणार आहे. याशिवाय ती 'प्रोजेक्ट के'मध्येही दिसणार आहे.