

सध्या कडाक्याच्या उन्हात फॅशन तर सोडा पण दुपारच्या वेळी बाहेर पडणं मुश्कील झालं आहे. पण बॉलिवूडच्या सेलेब्स या कडक उन्हाळ्यातही परफेक्ट फॅशन गोल्स देताना दिसत आहेत. या उन्हाळ्यात तुम्हालाही स्टायलिश आणि फॅशनेबल लुक मिळवायचा असेल तर तुम्हीही हे ट्रेंडी फॅशन लुक ट्राय करू शकता.


सोनम कपूरला बॉलिवूडची फॅशन दिवा म्हणून ओळखली जाते. सोनमचा हा हटके लुक या समरमध्ये तुम्ही फॅशनेबल ठेवण्यास मदत करेल. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम )


बॉलिवूडची बेबो करीना कपूर खानचा हा हटके समर लूक. सध्या सगळीकडेच वनसाइड शोल्डरची फॅशन आहे. तुम्ही जर यामध्ये कंफर्टेबल असाल तर हा लुक तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम )


अभिनेत्री क्रिती सेनन हा लुक यंदाच्या समरसाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम )


क्रितीनं या लुकसाठी डेनीम स्कर्टसोबत व्हाइट स्निकर कॅरी केले असून असा हटके लुक तुम्ही सहज ट्राय करून तिच्या प्रमाणे स्टायलिश दिसू शकता. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम )


पतौडी प्रिन्सेस नेहमीच तिच्या हटके फॅशनसाठी बॉलिवूडमध्ये ओळखली जाते. तिचा हा समर लुक तुम्हाला हटके आणि स्टायलिश दिसण्यासाठी मदत करू शकतो. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम )


सारानं घातलेला हा मॅक्सी ड्रेस घालण्यासाठी तुम्हाला स्लिम ट्रीम असण्याची आवश्यकता नाही. ही फॅशन सर्वांवर परफेक्ट दिसते आणि यावर तुम्ही मोजडीनं आणखी स्टायलिश लुक देऊ शकता. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम )