बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या आपला पती आणि क्रिकेटर विराट कोहलीसोबत लंडनमध्ये आहे. अनुष्का सतत काही ना काही मजेशीर फोटो शेयर करत असते. नुकताच अनुष्काने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर विराटसोबत खास फोटो शेयर केले आहेत. यामध्ये अनुष्का लंडनच्या रस्त्यांवर दिसून येत आहे. अनुष्काने विविध पोझमध्ये आपले फोटो शेयर केले आहेत. अनुष्का आणि विराट लंडनच्या रस्त्यांवर मजामस्ती करताना दिसून येत आहेत.