भारतीय क्रिकेट संघाचा कप्तान विराट कोहली आणि बॉलिवुड अभिनेत्री अनुष्का शर्मा नुकतेच आई-वडिल बनलेत. विराटनं ११ जानेवारीला आपल्या सोशल मीडियावरून या गोष्टीची माहिती दिली, की त्यांच्या घरी मुलगी जन्मली आहे. नुकतीच अनुष्कानं आपली एक मिरर सेल्फी शेअर केली आहे. हार्दिक पंड्यानं बेबी सिटिंगबाबत अनुष्काला या फोटोवर कमेंट करताना एक सल्ला दिला आहे.
मुलीच्या जन्मानंतर साधारण महिनाभरानं अनुष्कानं सेल्फी शेअर केला. यात तिच्या खांद्यावर बर्प क्लॉथ अर्थात बाळाला ढेकर देता यावा यासाठीचा कपडा किंवा लाळेरं दिसत आहे. सेल्फीसोबत अनुष्कानं लिहिलं आहे, ही माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची अॅक्सेसरी आहे. यावर हार्दिकनं लिहिलं, 'सर्वात महत्त्वाची गोष्ट' हार्दिकही मागच्या वर्षीच पालक बनला आहे.