बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट दिल्लीतील प्रसिद्ध बंगला साहेब गुरुद्वारामध्ये दर्शनासाठी गेली होती. आलिया भट्ट आपला खास मित्र आणि दिग्दर्शक आयान मुखर्जीसोबत याठिकाणी पोहोचली होती. आलिया भट्ट आणि रणबीर कपूर लवकरच आयान मुखर्जीच्या बहुप्रतीक्षित 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात झळकणार आहेत. या चित्रपटाचा आज मोशन पोस्टर रिलीज केला जाणार आहे. तत्पूर्वीच चित्रपटाचा दिग्दर्शक आणि अभिनेत्रीने गुरुद्वारामध्ये जाऊन दर्शन घेतलं आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून आलिया भट्ट आणि रणबीर कपूर पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र झळकणार आहेत. रिअल लाईफ कपलची रील लाईफ केमिस्ट्री पाहण्यासाठी चाहते फारच उत्सुक आहेत. या चित्रपटाच्या सेटवरच आलिया आणि रणबीर एकमेकांच्या जवळ आले होते. सध्या आलिया आणि रणबीर एकमेकांना डेट करत आहेत. इतकंच नव्हे तर या दोघांच्या लग्नाच्या चर्चादेखील सुरु आहेत. आलियाने रणबीरच्या वाढदिवसाला त्याच्यासोबत एक रोमँटिक फोरो शेअर करत आपलं नातं ऑफिशियल केलं होतं.