15 वर्षांपूर्वी ऐश्वर्या रॉयने आपल्या लग्नात नेसली होती इतकी महागडी साडी, किंमत ऐकून बसेल धक्का
ऐश्वर्या रॉय आणि अभिषेक बच्चनने 2007 मध्ये लग्न केलं होतं. त्यावेळच्या भारतातील सर्वात महागड्या विवाह सोहळ्यांपैकी एक हे लग्न होतं.
|
1/ 8
विश्वसुंदरी आणि बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रॉयने आपल्या सौंदर्याने अनेकांना अक्षरशः वेड लावलं होतं. चाहतेच नव्हे तर बॉलिवूड कलाकारसुद्धा तिच्या प्रेमात पडले होते. परंतु शेवटी अभिनेत्रीने अभिषेक बच्चनसोबत लग्न करत सर्वांनाच आश्चर्यचकित केलं होतं.
2/ 8
ऐश्वर्या रॉय आणि अभिषेक बच्चनने आपला लग्नसोहळा अतिशय खाजगी ठेवला होता. 15 वर्षांपूर्वी या दोघांनी कुटुंबीय आणि खास लोकांच्या समक्ष लग्नगाठ बांधली होती.
3/ 8
परंतु यावेळी ऐश्वर्या रॉयच्या साडीची जोरदार चर्चा झाली होती. यावेळी अभिनेत्रीने गोल्डन कलरची कांजीवरम नेसली होती. प्रसिद्ध फॅशन डिझायनर नीता लुल्लाने ही साडी डिझाईन केली होती.
4/ 8
अभिनेत्रीच्या साडीवर डझनाने मौल्यवान खडे लावण्यात आले होते. साडीवर अतिशय सुंदर असं नक्षीकाम होतं.
5/ 8
ऐश्वर्या रॉयने आपल्या लग्नात नेसलेल्या या साडीची किंमत तब्बल 75 लाख रुपये होती. ही साडी आजपर्यंतची सर्वात महागडी वेडिंग साडी आहे.
6/ 8
यावेळी अभिषेक बच्चन व्हाईट कलरच्या शेरवानीमध्ये दिसला होता. या शेरवानीवर सोन्याचं नक्षीकाम केलं होतं.
7/ 8
ऐश्वर्या रॉय आणि अभिषेक बच्चनने 2007 मध्ये लग्न केलं होतं. त्यावेळच्या भारतातील सर्वात महागड्या विवाह सोहळ्यांपैकी एक हे लग्न होतं.
8/ 8
अभिषेकने 'गुरु' चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान ऐश्वर्याला लग्नासाठी प्रपोज केलं होतं.त्यावेळी ते न्यूयॉर्कमध्ये होते. आज या दोघांना आराध्या नावाची गोंडस मुलगी आहे.