प्रसिद्ध बॉलिवूड निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरने काल आपला 50 वा वाढदिवस उत्साहात साजरा केला. मुंबईतील अंधेरी येथे स्थित यशराज फिल्म्समध्ये करण जोहरने वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशन केलं. या बर्थडे पार्टीमध्ये जवळजवळ सर्व मोठ्या बॉलिवूड स्टार्सनी हजेरी लावली होती. धर्मा प्रॉडक्शनचे सीईओ अपूर्व मेहता, टायगर श्रॉफ, मनीष मल्होत्रा यांच्यासह अनेक स्टार्स करणच्या वाढदिवसाच्या पार्टीला उपस्थित होते.