अभिनेता टायगर श्रॉफने बॉलिवूड मध्ये तब्बल सात वर्षे पूर्ण केली आहेत. 2014 मध्ये 'हिरोपंती' चित्रपटातून त्याने पदार्पण केलं होतं. मात्र सुरुवातीच्या काळात त्याचा गोरा रंग आणि दाढी नसलेला चेहरा बघून खूप ट्रोल करण्यात आलं होतं. त्याची तुलना अभिनेत्री करीना कपूरशी करण्यात आली होती. एका मुलाखती दरम्यान टायगरनं म्हटलं होतं, ट्रोलर्सचा माझ्यावर खुपचं परिणाम झाला होतं. लोक माझी 'गोरा चिकना' म्हणून टिंगल करत होते. मात्र नंतरच्या काळात टायगरने आपल्या अभिनया बरोबरचं आपल्या लुक आणि फिटनेसवर खूप मेहनत घेतली आहे. मात्र सध्या टायगरला फिटनेस आयकॉन म्हणून पाहिलं जातं. आज लाखो मुली त्याच्या लुकवर फिदा आहेत. टायगरच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एकापेक्षा एक एक्सरसाईजचे व्हिडीओ आहेत. हिरोपंतीच्या आधीच टायगरच्या मार्शल आर्टची जोरदार चर्चा होती.