कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) गरीब मजुरांच्या पाठिशी देवासारखा उभा राहिला होता. आजही अनेक गरजू लोकांना तो मदत करत आहे. लॉकडाऊनदरम्यान आपल्या घरापर्यंत पायी प्रवास करणाऱ्या मजुरांसाठी सोनू सूदने घरी जाण्याची व्यवस्था केली होती. आपल्या चांगल्या कामामुळे सोनू सूद रील लाइफमधलाच नाही तर रिअल लाइफमधला हिरो झाला आहे. यानंतर सोनू सूदच्या आयुष्यावर सिनेमा येणार असल्याचा चर्चांना उधाण आलं होतं. (Photo Credit- Sonu Sood Instagram)
सोनू सूदने दाखवलेल्या माणुसकीमुळे बॉलीवूडमध्येही त्याचं कौतुक होत आहे. सोनू सूदच्या आयुष्यावर येणाऱ्या सिनेमाबाबत अखेर त्याने मौन सोडलं आहे. सोनू म्हणाला, "मी आत्ता माझ्या कामामध्ये प्रचंड व्यस्त आहे. त्यामुळे आत्ता माझ्या आयुष्यावरील सिनेमाबाबत मी विचार केलेला नाही. आत्ताच माझ्या आयुष्यावर सिनेमा काढायचा म्हणजे थोडी घाई होईल. मला अजून बरंच काही करायचं आहे"
सोनू सूद म्हणाला, "अनेक निर्माते माझ्या आयुष्यावर चित्रपट बनवण्यासाठी उत्सुक आहेत. पण माझं आयुष्य मोठ्या पडद्यावर दाखवण्यासाठी मी अजून तयार नाही. सध्या मी अनेक मजुरांना मदत करत आहे. अनेक मजुरांना आजही माझ्या मदतीची गरज आहे. देवाने मला समाजासाठी काहीतरी चांगलं करण्याची संधी दिली आहे. त्यामुळे आत्ता मी माझ्यावरील चरित्रात्मक चित्रपटाचा विचार करत नाही".