बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा भाऊ आणि अभिनेता सोहेल खान घटस्फोट घेणार असल्याचं समोर आलं आहे. अरबाज आणि मलायकानंतर आता सोहेल आणि सीमा यांचादेखील घटस्फोट होणार असल्याने सर्वच चकित झाले आहेत. सीमा आणि सोहेल गेली अनेक दिवस विभक्त राहात असल्याचं सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आलं आहे. इन्स्टंट बॉलिवूडने दिलेल्या रिपोर्टनुसार या दोघांनी घटस्फोटासाठी कौटुंबिक न्यायालयात अर्ज केल्याचं सांगितलं जात आहे. सीमा आणि सोहेल यांनी 1998 मध्ये लग्नगाठ बांधली होती. या दोघांना निर्वाण आणि योहान अशी दोन मुले आहेत. लग्नाच्या तब्बल 24 वर्षांनंतर या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतल्याने सर्वच थक्क झाले आहेत.