या पोस्टमध्ये रितेशने लिहिलंय, ''मला तुम्हाला घट्ट मिठी मारुन वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत. तुमच्या पायांना स्पर्श करुन तुमचा आशीर्वाद घ्यायचा आहे. मला तुम्हाला आनंदात पाहायचं आहे. प्रत्येक वेळी पाठीवर थाप देऊन मी सोबत आहे हे म्हणताना पाहायचं आहे. नातवंडांसोबत खेळताना, त्यांना पुढे घेऊन जाताना, त्यांना गोष्ट सांगताना पाहायचंय. मला तुम्ही हवे आहात. तुमची फार आठवण येते बाबा'.