नक्षलवाद ते बॉलिवूड : भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी कसा होता मिथुन चक्रवर्तींचा प्रवास?
बॉलिवूडमध्ये आपली कारकिर्द गाजवणाऱ्या मिथुन चक्रवर्ती यांनी त्यांच्या आयुष्यातील एका नवीन इनिंगची सुरुवात केली आहे.
|
1/ 13
बॉलिवूडमध्ये आपली कारकिर्द गाजवणाऱ्या मिथुन चक्रवर्ती यांनी त्यांच्या आयुष्यातील एका नवीन इनिंगची सुरुवात केली आहे. नुकताच त्यांनी भाजप पक्षात प्रवेश केला आहे.
2/ 13
काही दिवसांपूर्वीच मोहन भागवत यांनी मिथुन चक्रवर्तीची भेट घेतली होती. त्यामुळे त्यांचा भाजप प्रवेश होऊ शकतो अशा चर्चांना सोशल मीडियावर जोर आला होता.
3/ 13
मुळचे बंगाली असलेल्या मिथुन चक्रवर्तींनी हिंदी चित्रपटांतून आपली एक खास ओळख निर्माण केली आहे.
4/ 13
मिथुन चक्रवर्ती यांनी 1976 मध्ये 'मृगया' या चित्रपटातून आपल्या करियरची सुरुवात केली. त्यांना पहिल्याच चित्रपटासाठी 'राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार' मिळाला होता.
5/ 13
1980 मध्ये त्यांच्या चित्रपटसृष्टीतील यशाचा आलेख उंचावला. ते एक उत्तम डान्सर म्हणून नावारूपाला आले.
6/ 13
1982 मध्ये प्रदर्शित झालेला 'डिस्को डान्सर' हा चित्रपट अतिशय लोकप्रिय ठरला होता. त्यात त्यांनी डिस्को डान्सर 'जिमी'ची भूमिका साकारली होती.
7/ 13
मिथुन चक्रवर्ती यांनी जवळपास 350 हिंदी चित्रपटांतून अभिनय केला आहे. हिंदीसोबातच त्यांनी बंगाली, ओडिशा आणि भोजपुरी चित्रपटांतदेखील काम केलं आहे.
8/ 13
मिथुन चक्रवर्ती अभिनेता होण्याआधी नक्षलवादी विचारांनी प्रभावित होते. मात्र एका दुर्घटनेमुळे त्यांनी आपला मार्ग बदलून अभिनय क्षेत्रात प्रवेश केला.
9/ 13
मिथुन चक्रवर्ती यांनी बॉलिवूड अभिनेत्री 'योगिता बाली' यांच्याशी विवाह केला आहे. त्यांना चार मुलंसुद्धा आहेत.
10/ 13
मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा महाक्षय चक्रवर्ती याने 2008 मध्ये 'जिमी' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यांनतर 2011 मध्ये भारतातील पहिला स्टोरीओ स्कोपिक हॉरर चित्रपट 'हॉटेंड'मध्ये काम केलं आहे.
11/ 13
काही वर्ष ते चित्रपटसृष्टीपासून दूर होते. त्यानंतर त्यांनी छोट्या पडद्यावर पुनरागमन करत, 'डान्स इंडिया डान्स'मध्ये परीक्षकाची भूमिका पार पाडली आहे.
12/ 13
त्यांनी आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीत राष्ट्रीय पुरस्कार, फिल्मफेअर, स्टार स्क्रीन, स्टारडस्ट असे अनेक पुरस्कार आपल्या नावे केले आहेत.
13/ 13
या जबरदस्त कलाकाराची राजकीय जडणघडण आता कशी असेल, याकडे सगळ्यांचं लक्ष असून त्यांची ही नवी इनिंग कशी असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.