काल देशभरात मुस्लिम बांधवांनी रमजान ईद साजरी केली. यावेळी बॉलिवूड कलाकारांनीसुद्धा सेलिब्रेशन केलं. काही बॉलिवूड कलाकारांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. बॉलिवूड परफेक्शनिस्ट आमिर खानची मुलगी आयरा खानने आपले काही फोटो शेअर केले आहेत. आयराने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपल्या ईद सेलेब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती आपला बॉयफ्रेंड नुपूर शिखरे, अभिनेता इम्रान खान आणि इतर कुटुंबियांसोबत दिसून येत आहे. यावेळी आयराने डीप नेक ब्लाउज आणि लेहेंगा परिधान केला आहे. ईद दिवशीच या स्टारकिड्सचा हा रिव्हिलिंग ड्रेस पाहून युजर्स तिला ट्रोल करत आहेत. अनेकांनी कमेंट्स करत, 'ईदला असले कपडे कोण घालतं?' असा प्रश्नसुद्धा केला आहे.