

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टसाठी २०१९ वर्ष फार खास असणार आहे. एकीकडे सध्या ती ‘गली बॉय’ या तिच्या आगामी सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे.


तर दुसरीकडे तिने नुकतंच एक भव्य घर विकत घेतलं आहे. मात्र घर घेताना तिने एक चूक केली. आलियाने ती प्रॉपर्टी बाजार भावाच्या किंमतीपेक्षा दुप्पट किंमतीत विकत घेतली.


आलियाने मुंबईतील जुहू येथे नवीन घर विकत घेतलं. डीएनएने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, हे घर जुहू येथील आलिशान इमारतीतील पहिल्या मजल्यावर आहे.


आलियाने या घरासाठी तब्बल १३ कोटी ११ लाख रुपये दिले. तर या घराची मूळ किंमत ७ कोटी ८६ लाख रुपये आहे.


आतापर्यंत आलियाने जास्त पैसे दिल्याची बातमी समोर आली आहे. तर दुसरीकडे एसएचके वेंचर्सचे संगीत हेमंत कुमार यांचं म्हणणं काही वेगळंच आहे.


हेमंत यांच्यामते, ही एक प्रीमियम प्रॉपर्टी आहे. याच्यासाठी आलियाने जी किंमत दिली ती चुकीची नाही. ही अशी प्रॉपर्टी आहे जिथे कोणताही सेलिब्रिटी गुंतवणूक करेल.