कतरिना कैफ आणि विकी कौशल पुढच्या आठवड्यात लग्नबंधनात अडकणार आहेत. दोघांच्या लग्नाच्या तारखेबाबत अजूनही साशंकता आहे. काही जण दावा करत आहेत की दोघेही 6 तारखेला लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत, तर काही रिपोर्ट्सनुसार, दोघे 9 डिसेंबरला राजस्थानमधील सिक्स सेन्सेस रिसॉर्टमध्ये 7 फेरे घेणार आहेत. विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्याकडून अद्याप लग्नाबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. दोघेही काही सांगत नसतील, पण आज आम्ही तुम्हाला त्यांच्या 'द अनटोल्ड लव्ह स्टोरी'बद्दल सांगणार आहोत.