इंटिमेट सीन्स... समलैंगिक भूमिका... बोल्डनेसमुळे नेहमीच वादात राहिली अभिनेत्री
कधी सिनेमातील इंटिमेट सीन तर कधी बोल्ड विधानं काही ना काही कारणानं ही अभिनेत्री नेहमीच चर्चेत असते.
|
1/ 9
कधी सिनेमातील इंटिमेट सीन तर कधी बोल्ड विधानं काही ना काही कारणानं ही अभिनेत्री नेहमीच चर्चेत असते.
2/ 9
स्वरा भास्करनं आपल्या बिनधास्त आणि बोल्डनेसमुळे बॉलिवूडमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.
3/ 9
स्वरा आज 32 वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनयाची कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसतानाही स्वरा आज बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये गणली जाते.
4/ 9
बॉलिवूडचा प्रवास स्वरासाठी म्हणावा तेवढा सोपा नव्हता त्यासाठी तिला खूप मेहनतही घ्यावी लागली.
5/ 9
पण एक वेळ अशी आली होती की नेहमीच साध्या सरळ भूमिका साकारणाऱ्या स्वरानं इंटिमेट सीन देत खळबळ उडवून दिली होती.
6/ 9
स्वरानं आतापर्यंत 'अनारकली ऑफ आरा', 'मछली जल की रानी है', 'गुजारिश', 'चिल्लर पार्टी', 'तनु वेड्स मनु', 'तनु वेड्स मनु रिटर्न्स' या सारख्या सिनेमात काम केलं आहे.
7/ 9
मात्र 2018 मध्ये रिलीज झालेल्या 'विरे द वेडिंग्स'मध्ये स्वरानं दिलेला मास्टरबेशन सीन प्रचंड गाजला. तिच्या या सीननं सगळीकडे खळबळ माजली होती.
8/ 9
स्वरा एवढ्यावरच थांबली नाही तर तिनं त्यानंतर शीर कोरमा या सिनेमात एका लेस्बियन मुलीची भूमिका साकारली.
9/ 9
या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च झाल्यावर सर्वांनीच स्वराच्या अभिनयाचं कौतुक केलं. कारण अशाप्रकारची भूमिका साकारणं अजिबात सोपं नाही. मात्र स्वरानं हे सुद्धा करुन दाखवलं आहे.(संकलन : मेघा जेठे.)