

तरुणाईच्या गळ्यातला ताईत असणारा अभिनेता म्हणजे कार्तिक आर्यन (Kartik Aaryan). आज कार्तिकचा वाढदिवस आहे. त्याच्या दमदार अभिनयामुळे त्याने कमी वयात फार मोठी प्रसिद्धी मिळवली आहे. कार्तिकने त्याच्या अभिनयाच्या करिअरमध्ये आत्तापर्यंत अनेक सुंदर अभिनेत्रींसोबत काम केलं आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त एक नजर टाकूया कार्तिकच्या अभिनय क्षेत्रातील प्रवासावर .


कार्तिक आणि नुसरत भरुचाची केमिस्ट्री प्रेक्षकांना अतिशय आवडली आहे. या दोघांनी आत्तापर्यंत 4 सिनेमांमध्ये एकत्र काम केलं आहे. 'सोनू के टीटू की स्वीटी' या सिनेमांत त्यांच्या भूमिका एकमेकांविरोधी दाखवण्यात आल्या होत्या तर 'प्यार का पंचनामा', 'आकाश वाणी', 'प्यार का पंचनामा-2' या सिनेमांमध्ये त्यांनी रोमान्स केला होता.


कृति सेनन आणि कार्तिक आर्यनने लुका छुपी या चित्रपटांत एकत्र काम केलं होतं. प्रेक्षकांना यांची जोडीही खूप आवडली होती.


पती, पत्नी और वो या सिनेमामध्ये कार्तिक आर्यनने भूमि पेडणेकरची जोडी पहिल्यांदा झळकली होती. त्यांचा रील लाइफ ड्रामा प्रेक्षकांना फार आवडला होता.


पती पत्नी और वो याच सिनेमामध्ये अनन्या पांडे आणि कार्तिक आर्यनची जोडीही सुपरहिट ठरली होती. सिनेमात कार्तिक आर्यन- भूमि पेडणेकर आणि अनन्या पांडे यांचा लव्ह ट्रॅगल दाखवण्यात आला होता.


कांची: द अनब्रेकेबल या सिनेमात मिष्टी चक्रवर्ती आणि कार्तिक आर्यनची जोडी पहिल्यांदाच एकत्र झळकली. पण या सिनेमाला प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद लाभला नाही.


कृति खरबंदा आणि कार्तिकने गेस्ट इन लंडन या सिनेमात एकत्र काम केलं होतं. या सिनेमात परेश रावल यांच्या जबरदस्त कॉमेडीचा तडकाही पाहायला मिळाला होता.


साला अली खान आणि कार्तिकची जोडी लव्ह आज कल या सिनेमांत झळकली होती. या सिनेमातील त्यांच्या केमिस्ट्रीचं फार कौतुक झालं होतं.