बॉलिवूडमध्ये सध्या अनेक सेलिब्रेटी गुड न्यूज देताना दिसत आहेत. आलिया भट्ट आणि रणबीर कपूरनंतर आता आणखी एका प्रसिद्ध कपलकडे गुड न्यूज असल्याचं समोर येत आहे. पिंकव्हीलाच्या रिपोर्टनुसार, बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसू प्रेग्नन्ट असल्याचं म्हटलं जात आहे. या रिपोर्टनुसार, बिपाशा आणि करण लवकरच ही गुड न्यूज जाहीर करणार आहेत. या रिपोर्टवर विश्वास ठेवला तर, हे सेलिब्रेटी कपल लग्नाच्या 7 वर्षानंतर पालक बनणार आहेत. सध्या सोशल मीडियावर या बिपाशा प्रचंड चर्चेत आली आहे. बिपाशा आणि करण सिंह ग्रोव्हर 2015 मध्ये 'अलोन' या चित्रपटाच्या सेटवर एकमेकांना भेटले होते. त्यांनतर 2015 मध्ये त्यांनी लग्न केलं होतं.