'बिग बॉस OTT' फेम अभिनेत्री उर्फी जावेद सतत सोशल मीडियावर चर्चेत असते. तिच्या फॅशन सेन्सची नेहमीच खिल्ली उडवली जाते.
2/ 8
उर्फी सतत अतरंगी ड्रेसमध्ये दिसून येते. सतत सोशल मीडियावर तिचे हॉट अँड बोल्ड फोटो व्हायरल होत असतात.
3/ 8
नुकताच इन्स्टाग्रामवर उर्फीचे काही व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाले आहेत. ज्यामुळे ती प्रचंड ट्रोल होत आहे.
4/ 8
या व्हायरल फोटोंमध्ये उर्फी जावेद स्किन कलरच्या एका विचित्र पोशाखात दिसून येत आहे.
5/ 8
यामध्ये एका ओढणीसारखा स्कार्फ अभिनेत्रीने टॉप म्हणून कॅरी केला आहे. तर खाली अशीच क्रीम कलरची बेल बॉटम पॅन्ट घातली आहे.
6/ 8
हा पोशाख पाहून युजर्स तिची खिल्ली उडवत आहेत. तसेच तिचा फॅशन सेन्स पाहून तिला प्रचंड ट्रोलदेखील केलं जात आहे.
7/ 8
एका युजरने कमेंट करत लिहिलं आहे, ड्रेस आहे कि चादर गुंडाळली आहे'. तर दुसऱ्याने लिहिलं आहे, 'हे काय आहे. फॅशन म्हणून काहीही'. तर आणखी एकाने लिहिलं आहे, 'फॅशन नव्हे हा मूर्खपणा आहे'.
8/ 8
उर्फी जावेदला बिग बॉस OTT या शोमुळे लोकप्रियता मिळाली आहे. तसेच तिने काही मालिकांमध्येही काम केलं आहे.