Bigg Boss Marathi: मीरा-स्नेहामध्ये पुन्हा जोरदार राडा; 'तळ्यात मळ्यात' टास्कने घरात येणार नवं वादळ
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये जसजसे दिवस जात आहेत, घरातील स्पर्धकांचं अस्तित्व धोक्यात येत आहे. प्रत्येकाला आपल्या अस्तित्वासाठी वाटेल ते करण्याची तयारी ठेवावी लागत आहे. मैत्री, प्रेम सर्व विसरून फक्त आपला विचार करणं गरजेचं झालं आहे.
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये जसजसे दिवस जात आहेत, घरातील स्पर्धकांचं अस्तित्व धोक्यात येत आहे. प्रत्येकाला आपल्या अस्तित्वासाठी वाटेल ते करण्याची तयारी ठेवावी लागत आहे. मैत्री, प्रेम सर्व विसरून फक्त आपला विचार करणं गरजेचं झालं आहे.
2/ 8
काल कॅप्टन मीराला बिग बॉस यांच्या आदेशानुसार अतिशय कठीण असा निर्णय असा घ्यावा लागला. घरातील काही सदस्यांमुळे टास्क रद्द होतात, काही सदस्य घरातील नियमभंग करतात, काही सदस्यांद्वारे टास्कमध्ये आक्रमकता दाखविली जाते अशा सदस्यांची नावे काल मीराला द्यावी लागली.
3/ 8
ज्यामध्ये सोनाली, विकास, जय, विशाल आणि दादूस यांचे नावं होते. आजदेखील मीराला अशीच नवे द्यायची होती. आणि त्यावरून मीरा आणि घरातील काही सदस्यांमध्ये वाद झाले. आणखीही वादविवाद होणार आहेत.
4/ 8
मीरा म्हणाली, स्वत: ट्राय नाही कारायचा. जय म्हणाला, स्वत:ला ट्राय काय नाही करायचे, आम्हीच ट्राय केले. जरा बघा डोळे उघडा आणि कान पण उघडा... त्यावर मीराचे म्हणणे आहे तुम्ही प्रयत्न नाही केला.
5/ 8
विकासने देखील यावर त्याचे म्हणणे मांडले ट्राय करण्याच्या बाबतीत तुम्ही जी तीन नावे दिली आहेत त्यांनी सर्वात जास्त ट्राय केलं आहे असं मला अजूनही वाटतं आहे. जे लोकं सर्वात जास्त बोले आहेत तेच तळ्यात आहेत.
6/ 8
बाहेरून दिसताना हेच दिसणार आहे जे लोकं सर्वात जास्त बोले त्यांनाच तुम्ही शिक्षा देत आहात. या वादात स्नेहा आणि मीरामध्ये पुन्हाएकदा वादाची ठिणगी पडणार आहे.
7/ 8
मीराचे म्हणणे आहे इथे समोर येते मी तेव्हा बोलायचे. स्नेहा बोलत असताना मीरा बोलत होती त्यावर स्नेहा म्हणाली ए थांब... मीरा तिला म्हणाली... थांब नाही बोलायच मला...
8/ 8
स्नेहा म्हणाली, मी तेव्हाच बोले... मीरा म्हणाली, तेच तेच परत बोलून काहीच होणार नाहीये, जरा काहीतरी नवीन शोध. नक्की हा वाद कशावरून झाला ? हे आजच्या भागात समजणार आहे.