बिग बॉस मराठीचं तिसरं पर्व नुकताच आपल्या भेटीला आलं आहे. सर्वांनाच हा शो पाहायची मोठी इच्छा होती. मात्र कोरोना काळामध्ये शो लांबणीवर पडला होता. मात्र अखेर १९ ऑक्टोबरला हा शो सुरु झाला आहे. शोमध्ये पहिल्याच आठवड्यात मोठं-मोठे ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. त्यामुळे प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन होत आहे.