'बिग बॉस मराठी'च्या माध्यमातून अभिनेत्री तेजस्विनी लोणारी घराघरात पोहोचली आहे.
2/ 8
तेजस्विनीला या शोमुळे प्रचंड लोकप्रियता आणि प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालं आहे. हाताला दुखापत झाल्यामुळे तेजस्विनीला मधूनच शो सोडावा लागला होता.
3/ 8
परंतु प्रेक्षक तिला विजेतीच्या रुपात पाहात होते. बाहेर पडल्यानंतर सुद्धा लोकांनी तिला पब्लिक विनर संबोधलं होतं.
4/ 8
तेजस्विनी या शोनंतरसुद्धा प्रचंड चर्चेत आहे. नुकतंच एका युट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत तेजस्विनीने आपल्या बालपणीचा एक गमतीदार किस्सा सांगितला आहे.
5/ 8
राजश्री मराठीच्या एका मुलाखतीत तेजस्विनीने सांगितलं की, लहानपणी ती आणि तिचा भाऊ प्रचंड भांडत असत. आणि त्यामुळे त्यांना आईचा प्रचंड मारसुद्धा खावा लागला होता.
6/ 8
अभिनेत्रीने पुढे सांगितलं की,एकदा भावासोबत भांडण झालं असताना त्याने झोपेत माझे केसच कातरले. त्यांनतर आम्ही प्रचंड भांडलो.
7/ 8
नंतर मी त्याला मारही दिला. परंतु त्याने पुन्हा मी समजून पांघरुण घेऊन झोपलेल्या आमच्या आईलाच लाटण्याने मारलं. त्यांनतर पुन्हा आईने त्याची शाळा घेतली होती.
8/ 8
तेजस्विनी सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात आहे.