'Bigg Boss Marathi' फेम स्नेहा वाघला गंभीर दुखापत; चाहते चिंतेत!
स्नेहाला बिग बॉस मराठीमुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. स्नेहाने यापूर्वी अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. मात्र या शोने तिला पुन्हा घराघरात पोहोचवलं आहे.
|
1/ 8
सध्या बिग बॉस मराठीचा (Bigg Boss Marathi) तिसरा सीजन (Season 3) सुरु आहे. हा सीजन चांगलाच चर्चेत आहे. घरातील राडे, वादविवाद असो, मैत्री असो, प्रेम असो किंवा स्पर्धकांची पर्सनल लाईफ असो. या सर्वांचीच जोरदार चर्चा सुरु आहे.
2/ 8
नुकताच घरातून स्नेहा वाघ (Sneha Wagh) बाहेर पडली होती. त्यामुळे तिचे चाहते नाराज झाले होते. मात्र घरातून बाहेर पडताच स्न्हेहा सोशल मीडियावर सक्रिय झाली आहे.
3/ 8
स्नेहाने काही वेळेपूर्वी एक पोस्ट शेअर करत आपल्याला एक दुखापत झाल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे तिचे चाहते चिंतेत आहेत.
4/ 8
स्नेहाने इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत सांगितलं आहे, कि तिला छोटीशी दुखापत झाली आहे. मात्र तिचा परिणाम मोठा दिसत आहे.
5/ 8
या दुखापतीमुळे तिला फेशियल हेमाटोमा झाल्याचं तिनं म्हटलं आहे. हा एक स्किनशी संबंधित आजार आहे.
6/ 8
मात्र तिने चाहत्यांना काळजी करू नका मी लवकर बारी होईन असा दिलासा दिला आहे.
7/ 8
स्नेहाला बिग बॉस मराठीमुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. स्नेहाने यापूर्वी अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. मात्र या शोने तिला पुन्हा घराघरात पोहोचवलं आहे.
8/ 8
या शोमध्ये स्नेहाच्या प्रोफेशनल लाईफपेक्षा तिच्या पर्सनल लाईफचीच जास्त चर्चा झाली. तिच्या फॅमिलीपासून ते तिच्या दोन लग्न आणि घटस्फोटपर्यंत सर्व विषय समोर आले होते. त्यामुळे स्नेहा फारच चर्चेत होती.