बिग बॉस मराठी सीजन तिसऱ्या भागातील सर्वात चर्चित स्पर्धक कोण असेल तर ती मीरा जगन्नाथ. मीरा जगन्नाथ सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. तिच्या थायलंड वारीचे काही फोटो आणि व्हिडिओ तिनं इन्स्टावर शेअर केले आहेत. ती थायलंडमध्ये काय करते आहे असा अनेकांना प्रश्न पडला आहे. मीरा तिच्या आगामी प्रोजक्टसाठी थायलंडला गेल्याची चर्चा आहे. तिच्या आगामी प्रोजक्टचं शुटींग ती थायलंडमध्ये करत असल्याचे समोर आलं आहे. मीराचा थायलंडमधील बीच लुक सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. मीराचे बोल्ड फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेता विषय ठराल आहे. मीरानं मात्र तिच्या आगामी प्रोजक्टबद्दल अद्याप कोणतीच माहिती दिलेली नाही. माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतून मीरानं मराठी टीव्ही इंडस्ट्रीत डेब्यू केला होता. या टीव्ही मालिकेत तिने संजना ही व्यक्तिरेखा साकारली होती. “येऊ कशी तशी मी नांदायला” या मालिकेत तिने मोमोची भूमिका साकारली होती. ( फोटो साभार- मीरा जगन्नाथ) ि