'मिसेस मुख्यमंत्री', 'बिग बॉस मराठी'च्या माध्यमातून अभिनेत्री अमृता धोंगडे घराघरात पोहोचली आहे. अमृता धोंगडेचा मोठा चाहतावर्ग आहे. मूळची कोल्हापूरची असणारी अमृता छोट्या पडद्यावरील एक ओळखीचा चेहरा बनली आहे. विविध मालिकांमध्ये अमृता धोंगडेने साध्या सोज्वळ मुलीची भूमिका साकारल्या आहेत. मात्र खऱ्या आयुष्यात अमृता फारच ग्लॅमरस आहे. ती सतत स्टायलिश फोटो शेअर करत असते. दरम्यान आता बिग बॉसच्या घरातून आल्यांनतर अमृताने आपला लूक पूर्णपणे बदलला आहे. अमृताने नुकतंच एक सुंदर हेयरकट केला आहे. यामध्ये ती फारच सुंदर दिसत आहे. ही 'मिसेस मुखमंत्री'मधील तीच सुमी आहे का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. अमृता धोंगडेला बिग बॉस मराठीमुळे चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. पण चाहते तिला आता मालिकेमध्ये पाहण्यासाठी आतुर आहेत.