बिग बॉस मराठीच्या घरामधील सदस्यांमध्ये रूसवे-फुगवे होतच असतात.आपली जवळची व्यक्ति थोडं जरी वेगळं वागली,. त्यांचा निर्णय आपल्या निर्णयापेक्षा वेगळा असला किंवा आपल्याला त्यांनी साथ दिली नाही तर लगेच सदस्यांना वाईट वाटतं.
2/ 8
असंच काहीसं आज सोनाली आणि विशालमध्ये घडणार आहे. घरामध्ये विशाल आणि सोनालीची भांडण, मस्करी सुरूच असते. पण आजची गोष्ट सोनालीच्या मनाला खूपच जास्त लागली आहे असे तिच्या बोलण्यावरून दिसून येत आहे.
3/ 8
नव्या प्रोमोमध्ये सोनाली विशालला म्हणाली, “जर मी तुझ्यामध्ये टाईम इनव्हेस्ट करते तर मला तुझ्याकडून रिटर्नची अपेक्षा आहे. विशाल म्हणाला, मी नाही करत का टाईम इनव्हेस्ट?
4/ 8
सोनाली त्यावर म्हणाली, त्यांच्यातल्या गृपमधील सदस्यांनी कोणाचं दुसर्याच नावं घेतलं का ? तू का नाही माझं नावं घेतलंसं. विशालचं म्हणण आहे, मला जे वाटलं ते मी केलं.
5/ 8
सोनाली म्हणाली, उत्कर्ष म्हणाला सोनालीचा घसा.. विशालनी तोच मुद्दा उचलून म्हणाला, त्याचं मत आणि माझं मतं क्लियर नको करूस. सोनाली म्हणाली, पहिल्या आठवड्यात माझा आवाज मोठा आहे म्हणून बोललं गेलं.
6/ 8
तेव्हापासून तुला माहिती आहे, बाकीच्यांना नसेल माहिती एखादवेळेस.तू फालतू रिझन देऊ नको. यावर विशाल म्हणाला फालतू नाहीये रिझन, तू माझ्या रिझनला फालतू नाही म्हणू शकतं. सोनाली म्हणाली, “फालतूचं आहे रिझन. तुला माणसांची किंमत नाहीये. खूप कमी किंमत आहे.
7/ 8
तुझे statement त्या व्यक्तींपेक्षा मोठे असतात. तुझं म्हणण त्या व्यक्तींपेक्षा मोठे असतं. तुझी सिचुएशन त्या व्यक्तिवर काय बेतलेलं आहे त्यापेक्षा मोठी असते. आणि प्रत्येक वेळेला असं झालेलं आहे”.
8/ 8
आता या दोघांमध्ये नक्की काय घडलं आहे. हे दोघे कोणत्या मुद्द्यावर बोलत आहेत? आणि विशाल सोनालीचा रुसवा घालवण्यात यशस्वी होईल का? हे आता येणाऱ्या एपिसोडमध्येच समजेल.